शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांची आज पत्रकार परिषदेत माहिती
पारोळा ( प्रतिनिधी ) – शहराची वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक , जलकुंभ व जलशुद्धीकरण क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे या कामांसाठी राज्य सरकारने १ कोटी रुपये मंजूर केले आहेत या निधीची मागणी २६ ऑक्टोबररोजी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती .
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व जलशुध्दीकरण क्षमता वाढविणेसाठी निधीची मागणी केल्यावर त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन वैशिट्यपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर केला. याबाबत शासन निर्णय ( क्र.नपावै-२०२१/प्र.क्र.२०१(५)/नवि-१६ दि.03 -11-2021) नुसार आदेश अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत .
पारोळा शहरासाठी पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पुरविले जाते धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांनाही शहराला सध्या ८ ते १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो नवीन जलकुंभ उभारणी व जलशुद्धीकरण क्षमता वाढल्यानंतर किमान एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होईल
या मंजुरीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार चिमणराव पाटीलब यांचे सहकार्य लाभले , असे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले .