पारोळा नगरपालिकेत महाविकास आघाडी की महायुती ? उमेदवारांमध्ये धाकधूक
पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, २४ जागांसाठी झालेले प्रभागनिहाय मतदान
पारोळा प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या १२ प्रभागातून नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान शांततेत झाले. नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदाच्या २४ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. दि. २१ रोजी मतमोजणी असून जनतेने कोणाची निवड केली हे त्यावेळी दिसून येणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी युतीतर्फे चंद्रकांत भिकनराव पाटील, जनआधार विकास पार्टीतर्फे अंजली करण पाटील तर काँग्रेसतर्फे सुवर्णा वसंत पाटील हे तीन उमेदवार रिंगणात होते. अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणुक पार पडली. प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेत. आता कुणाच्या प्रयत्नांना किती यश येते यासाठी दि. २१ डिसेंबर २०२५ ची वाट पहावी लागेल.
प्रभागनिहाय झालेले मतदान
प्रभाग क्र.१ मतदान पुरुष मतदार १४५८, महिला मतदार १४७७, तृतीयपंथी मतदार ६ एकुण मतदार २९४१ पैकी झालेले मतदान पुरुष ११८२, महिला १०३० व तृतीयपंथी ४ असे एकुण मतदान २२१६. प्रभाग क्र.२ पुरुष मतदार १२३०, महिला मतदार १२४२, एकूण मतदार २४७२ पैकी झालेले मतदान पुरुष ९२१. महिला ८७८ असे एकुण मतदान १७९९. प्रभाग क्र.३ पुरुष मतदार ११५४, महिला मतदार ११७३ एकुण मतदार २३२७ पैकी झालेले मतदान पुरुष ९२३, महिला ९०० असे एकुण मतदान १८२३.
प्रभाग क्र.४ पुरुष मतदार १३६७, महिला मतदार १३८८, तृतीयपंथी मतदार १ एकुण मतदार २७५६ पैकी झालेले मतदान पुरुष १०९९, महिला १००५ व तृतीयपंथी ०० असे एकुण मतदान २१०४. प्रभाग क्र.५ पुरुष मतदार १४६९, महिला मतदार १५३३, तृतीयपंथी मतदार १ एकुण मतदार ३००३ पैकी झालेले मतदान पुरुष १०९८, महिला १११६ व तृतीयपंथी मतदान ०० असे एकुण मतदान २२१४.
प्रभाग क्र.६ पुरुष मतदार १३९७, महिला मतदार १४३४ एकुण मतदार २८३१ पैकी झालेले मतदान पुरुष ११०७, महिला १०९० असे एकुण मतदान २१९७. प्रभाग क्र.७- पुरुष मतदार १९५०, महिला मतदार २००८ एकुण मतदार ३९५८ पैकी झालेले मतदान पुरुष १४३१, महिला १३७५ असे एकुण मतदान २८०६. प्रभाग क्र.८ पुरुष मतदार १५६४, महिला मतदार १६०९ एकुण मतदार ३१७३ पैकी झालेले मतदान पुरुष १०४६, महिला १००९ असे एकुण मतदान २०५५. प्रभाग क्र.९ पुरुष मतदार १७६०, महिला मतदार १७६० एकुण मतदार ३५२० पैकी झालेले मतदान पुरुष १२६९, महिला १२१९ असे एकुण मतदान २४८८.
प्रभाग क्र. १० पुरुष मतदार १२९९, महिला मतदार १३६७ एकुण मतदार २६६६ पैकी झालेले मतदान पुरुष ९५३, महिला १०८४ असे एकुण मतदान २०३७. प्रभाग क्र. ११ पुरुष मतदार १५४४, महिला मतदार १४७७ एकुण मतदार ३०२१ पैकी झालेले मतदान पुरुष १०८१, महिला १०२३ असे एकुण मतदान २१०४. प्रभाग क्र.१२ पुरुष मतदार १४६८, महिला मतदार १४२६ एकुण मतदार २८९४ पैकी झालेले मतदान पुरुष १०५४, महिला १०१४ असे एकुण मतदान २०६८. असे मतदान झाले.









