पारोळा(प्रतिनिधी) तालुक्यातील वाघरा वाघरी ते शिरसमणी जोडाला जाणारा जवळ पास ४ ते ५ किमी रस्ता असून या रस्त्याचे सन २०१८ मध्ये काम करण्यात आले होते परंतु या रस्त्यांच्या मध्यल्या भागातील २७५ मीटरचे काम अर्ध्यावर सोडलेले असून ते पूर्ण करण्याची मागणी वाघरी येथील नाना- नानी पाणी फाऊडेशन पाणलोट प्रकल्पाचे शिल्पकार नाना पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर असे कि सन २०१८ मध्ये वाघरा- वाघरी येथे पाणी फाऊंडेशन पाणलोट प्रकल्पा अर्तगत अमीरखान यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पहिला कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमांचे नियोजन कर्त्य वाघरी येथील शेतकरी नाना भिकारी पाटील यांनी त्यांच्या शेतात केला होता त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमांतुन आपल्या परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा जनजागृती करून त्या भागात फक्त कोरडवाहू पिक घेतले जात होते परंतु त्यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केल्याने परिसरांत आज १० ते १५ पाणलोट प्रकल्प झाली असून आजही भर मार्च महिन्याच्या उन्हाच्या तडाक्यात देखील पाणी असून शेतकरी फळे भाजीपाला अशी पिके शेतकरी घेत आहेत
सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पाणी फाऊडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जीरवा या योजने अंतर्गत पाणलोट कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी त्या कार्यक्रमांस उपस्थित तात्कालीन जिल्हा अधिकारी यांनी या परिसरातील शेतकरी यांच्या मागणीला हाक देत वाघरा वाघरी ते शिरसमणी जाणारा गांव रस्ताची दुरा आवस्था बघुन तात्काळ रस्ता दुरुस्ती करून डामरीकरण करण्यात आले परंतु या रस्त्याचा २७५ मिटर रस्ता आजही अपूर्ण असून पूर्णत्वाची प्रतिक्षेत आहे तो पूर्ण करण्यात यावा आज पाणी फाऊंडेशन कार्यक्रमास आज तीन वर्षै पूर्ण झाली तरी देखील रस्त्यांचे काम रखडले असून ते पूर्ण करण्याची मागणी करून शेतकरी आपल्या शेताच्या बांधा पर्यत जाऊन आपली शेती अधिक विकसित करून चांगले पिक घेऊ शकेल शेतकरी टिकाला तरच विकास होईल अशी मागणी नाना- नानी पाणी फाऊंडेशनचे नाना भिकारी पाटील यांच्या सह शेतकर्यानी केली आहे.