पारोळा : येथील बालाजी नगर भागात कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेल्या कुटुंबियांच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी दीड लाखाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना येथे घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

पारोळा शहरातील सतीश पाटील (रा. न्यू बालाजी नगर पारोळा) हे दिनांक १६ रोजी आपल्या मूळ गावी नेरी ता. पाचोरा येथे आपल्या पुटण्याचा नवसाच्या कार्यक्रमानिमित्त परिवारासह गेले होते. याचे औचित्य साधत दिनांक १६च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचा पुढचा दरवाजाचा कडीकोडा तोडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला व घरातील कपाटात असलेल्या बॅग व पर्स मधील असलेले ८० हजार रुपये रोख, नऊ ग्रॅम सोने डोंगल, सात भार चांदीचा गोप व शिक्के होते असे एकूण एक दीड लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.याप्रकरणी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







