पारोळा ;- पारोळा तहसीलला आज दुपारी 12 वाजता बर्ड फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना तालुका समिती बैठक सभा प्रांत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला प्रांत विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे,बीडीओ पाटील,एलडीओ डॉ. सूर्यवंशी,एपीआय बागुल,बांधकाम विभाग उप अभियंता बाविस्कर,तालुका भूमी अभिलेख प्रतिनिधी श्री बैरागी,तहसिल वरिष्ठ लिपिक श्री वारकर हजर होते
कुठेही अचानक मृत कोंबड्या, पक्षी आढळल्यास प्रशासन ला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येते . या सभेत मृत पक्षी आढळल्यास ते तपासणीसाठी एलडीओ यांनी पुणे लॅब ला पाठवावे. लगेच तो परिसर जिल्हाधिकारी यांच्या कडून अलर्ट झोन घोषित होईल. जर नमुना पोसिटीव्ह आढळला तर कि.मी . परिसर भूमी अभिलेख विभाग मार्क करेल . बांधकाम खात्याकडून त्वरित जेसीबी आणि मजूर उपलबध करून सरकारी जागेत खड्डे करून 1 की मी परिसरातील कोंबड्या पशु धन विभाग कडुन पुरल्या जातील. महसूल व ग्रामसेवक पंचनामा करतील. कोणी सहकार्य न केल्यास/पोल्ट्री फार्म व्यक्ती ने कोंबड्या न दिल्यास पोलीस विभाग LDO यांना मदत करतील. तहसिलदार प्रांत पूर्ण कार्यवाहीचे समनव्य करतील असे या बैठकीत ठरविण्यात आले.








