पारोळा ;- शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात एका घराच्या छतावर अर्धवट पाय नसलेले अर्भक आढळून आल्याने शहरात एकाच खळबळ उडाली असून याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , हवालदार मोहल्ला परिसरात एका घराच्या छतावर आज एक नवजात अर्भक कमरेपासून पाय नसलेल्या अवस्थेत आढळून आले असून त्याच्या कमरेखालील भागाचे लचके कुणी तोडले, कुणी या अर्भकाला फेकले याचा शोध पोलीस घेत असून अर्भकाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती . पुढील तपास पोलीस करीत आहे.







