पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरात नव्याने जलकुंभ उभारणीच्या कामासाठी मिळालेला निधी मार्च २०२२ अखेरपर्यत खर्च करणे गरजेचे असल्याने तात्काळ प्रशासकीय मान्यता, ईस्टीमेट, तांत्रीक मंजूरी, कार्यादेश देऊन काम सूरू करावे या मागणीचे निवेदन आज मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पारोळा शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्याची पिण्याच्या पाण्याची साठवणूक सुविधा, जलकुंभ व जलशुद्धीकरण क्षमता वाढविण्याकरिता शासना कडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली आहे . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली होती त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन नगर विकास विभागामार्फत वैशिट्यपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर केला व शासन निर्णय ( क्र.नपावै-२०२१/प्र.क्र.२०१(५)/नवि-१६ दि.03 -11-2021 ) जारी केला आहे .
पारोळा शहरासाठी पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनी द्वारे पुरविले जाते धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांनाही शहराला १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो या नवीन जलकुंभ उभारणीनंतर शहराला किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होईल