जीवन जगत असताना चढ-उतार, सुख-दुःख, संपन्नता-न्यूनता या गोष्टीतून जावे लागते. जीवनात कोणतीही परिस्थिती येवो, त्या परिस्थितीत स्थितप्रज्ञ असा त्यातही प्रसन्न, आनंदी राहण्याचे लक्ष्य प्राप्त करा असे आवाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.
आपले जीवन फार छोटे आहे. म्हटले तर ती ‘एक साथ की यात्रा’ यात वैर, राग, नकारात्मकता ठेऊन कशाला जगावे. कोणतीही परिस्थिती ही तात्पुरती निर्माण झालेली असते, कुणी तुमचा तिरस्कार केले, अपमान केला तर मुळीच मनाला लावून घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत प्रसंन्न आणि आनंदी रहायचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे. आजच्या डीप्रेशन आणि नकारात्मकतेमुळे शारीरीक त्रास देखील उद्भवत आहेत. त्यावर प्रसन्नचित्त राहणे हा सोपा उपाय असतो याबाबतचे मार्गदर्श प्रवचनातन केले. जॉन लेनन यांचे उदाहरण त्यांनी उपस्थितांना दिले, क्लासमध्ये सगळ्यांना विचारले की तू मोठ्यापणी कोण बनणार? त्यावर लेननचे उत्तर जगावेगळे होते. तो म्हणाला, ‘मी खूश राहणार.’ उत्तर मार्मिक होते. आजच्या परिस्थितीला समोर छपन्न भोग असतात पण तब्येत ते खाण्यास मनाई करते. त्यामुळे उगिचचा ताण निर्माण होतो. एक डॉक्टर सदैव प्रसन्नचित्त राहत असत. त्याला त्याचे गुपित विचारले असता डॉक्टरने जिंदगीत प्रसन्न कसे रहावे याचा जणू मंत्रच दिला. गोळीने मला शिकविले. कडू गोळी असते ती चघळत बसतो का आपण? ती पटकन गिळून टाकतो. गोड गोळी चघळतो ना. तसे कटू वाईट गोष्टी पटकन सोडून द्याव्यात व गोड आठवणी चघळत रहाव्या. असे केले तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही प्रसन्न व आनंदी राहू शकाल. या प्रवचनाआधी परमपुज्य भूतीप्रज्ञ महाराज साहेब यांनी धर्माचा व्यक्तीवर कसा प्रभाव असतो ते समजावून सांगितले. नियमीत स्वाध्याय करणे, धर्म आराधना करणे महत्त्वाचे ठरते. मित्र देखील धर्मानुरागी असावेत. कल्याण मित्र, धर्म मित्र हे आपल्या धर्म आराधना करण्यासाठी प्रेरणा देत असतात याबाबतही सविस्तर सांगितले.