जळगाव-चांगली तयारी केलेल्या विद्यार्थ्यांसाठीही परीक्षांचा काळ खूपच कठीण असू शकतो. थोडा ताण जाणवणे स्वाभाविक असले तरी, ताण येऊ दिल्याने तुमच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.योग्य नियोजन,प्राधान्यक्रम सक्रियता,पुरेशी झोप, शरीराला आणि मनाला ऊर्जा,माइंडफुलनेसचा सराव आणि यशाची कल्पना या पंचसुत्रीच्या आधारावर तुम्ही यश मिळवू शकतात असे मत तज्ञांनी ऑनलाईन कार्यशाळेत व्यक्त केले.
निमीत्त होते गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने जळगावने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या देखरेखीखाली मास्टरिंग परीक्षा ताण या विषयावरील अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित केले होते. या सत्रात विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्रीमती डॉ. मानसी हिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होत्या. या कार्यक्रमाला बेसिकबीएस्सी पहिल्या ९९ आणि ५ व्या सेमीस्टरचे ९२ विद्यार्थी उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करतांना डॉ मानसी यांनी परिक्षेच्या काळात या पंचसुत्री बरोबर तणाव टाळण्यासाठी काय केले पाहीजे हे देखिल स्पष्ट केले. प्राचार्य विशाखा गणविर यांनी प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. मनोरमा कश्यप, सहाय्यक प्रा. स्वाती गाडेगोणे, नर्सिंग ट्यूटर पायल हांडे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे इ सहभागी झाले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी, विशेषतः तणावपूर्ण परीक्षेच्या काळात एक स्तुत्य पाऊल आहे. कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करतांना डॉ. मानसी यांनी तुमच्या परीक्षेच्या तयारीत धोरणांचा समावेश केल्याने तुम्हाला तुमची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होईलच, शिवाय परीक्षेच्या पलीकडेही तुम्हाला फायदा होईल अशा शिक्षणाबद्दल खरी आवड निर्माण होईल. लक्षात ठेवा, मुख्य गोष्ट म्हणजे सामग्रीमध्ये सक्रियपणे सहभागी होणे, स्वतःला आव्हान देणे आणि सकारात्मक शिक्षण वातावरण तयार करणे होय असे सांगितले. सुत्रसंचालन व आभार यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.