कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षाआधीच ब्लूटूथसह केले जेरबंद
धरणगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दिल्लीच्या पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत गुरुवारी परीक्षा घेण्यात आली या वेळी, कानात ब्ल्युटुथ टाकून गैरमार्गाने परिक्षेत उत्तरे लिहिण्याचा दोघा परिक्षार्थींचा प्रयत्न धरणगाव पोलिसांनी हाणून पाडला. त्यांना अटक करण्यात आली असून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष कुलदिप दहिया (रा. मोहम्मदाबाद जि. सोनपत हरियाणा) आणि दिपक जोगिंदर सिंग (हिसार हरियाणा) अशी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ऑनलाईन परिक्षा धरणगाव येथील एका केंद्रावर सुरु होती. यावेळी आशिष दहिया आणि दिपक सिंग हे दोघे परिक्षार्थी या केंदावर परिक्षा देण्यासाठी आले होते.
परिक्षेत गैर प्रकार करण्याच्या उद्देशाने दोघा परिक्षार्थींच्या कानात पिवळसर व वरच्या बाजूला काळा पट्टा असलेला ब्ल्युटुथ डिवाईस आढळून आला. या ब्ल्यु टुथ डिवाईसचा गैरवापर होण्यापुर्वीच दोघांना परिक्षा हॉलमधे जाण्यापासून अडवण्यात आले. दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ करत आहेत.