पारोळा तालुक्यातील दळवेल येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दळवेल येथील ५५ वर्षीय वृद्धाचा नाल्यात मातीच्या बंधाऱ्याच्या पाण्यात पडून बुडून मरण पावल्याची घटना दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय भिका भील रा. दळवेल यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. मयत सुरेश सुकदेव भिल हे सरलाबाई संजय पाटील (रा. दळवेल ता. पारोळा) यांचे शेताजवळ नाल्यात मातीच्या बंधाऱ्याच्या पाण्यात दुपारी ४.३० वा. सुमारास पाण्यात तरगतांना दिसला. त्यांना बाहेर काढून खाजगी वाहनाने कुटिर रुग्णालय पारोळा येथे संध्याकाळी ०६.३० वाजेचे सुमारास दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी सुरेश सुकदेव भिल यास तपासून मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.