“लव्ह जिहाद” प्रश्नावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
जबलपूर (वृत्तसंस्था) – मध्य प्रदेशातील जबलपूर येथे “लव्ह जिहाद” विषयी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी, प्रेम म्हणजे प्रेम आहे. प्रेमाला भिंती दिसत नाहीत. जर दोन माणसं निव्वळ प्रेमातून एकत्र आली असतील तर त्याचा आदर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.
#WATCH | "…I think love is love. Love sees no walls. If two people have come together purely out of love, it should be respected. But if there is some bitterness and artifice behind it, it should be seen differently," says BJP national secretary Pankaja Munde on 'Love Jihad',… pic.twitter.com/xj4v4yU6xM
— ANI (@ANI) June 11, 2023
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत जबलपूरमध्ये मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीची नोंद केली. पंकजा मुंडे यांना लव्ह जिहादबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, गरीब कल्याण आणि विकास हा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर राहिला आहे. मला वाटतं प्रेम म्हणजे प्रेम आहे. प्रेमाला भिंती दिसत नाहीत. जर दोन माणसं निव्वळ प्रेमातून एकत्र आली असतील तर त्याचा आदर केला पाहिजे. पण त्यामागे काही कटुता आणि कारस्थान असेल तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे.”