डांभुर्णी ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डांभुर्णी येथे आज पंचायत राज समितीने भेट दिली. या भेटीत त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परीषद शाळेला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली.

याप्रसंगी गडचिरोलीचे आमदार देवराज होळी व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचेसह पथकाने जि.प.शाळेतील पाहणी करीत माहीती जाणून घेतली या शाळेत शासनाने मंजुर केलेल्या इयत्ता पाचवीचा वर्ग मंजुर होऊनही अद्याप का सुरु केला नाही. याबाबत केंद्रप्रमुख सोनवणे यांचेवर अनिल पाटील व देवराज होळी यांनी ताषेरे ओढले त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते मुरलीधर पाटील यांनी डांभुर्णीच्या घरकुल योजनेतील भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी करणारे निवेदन पंचायत राज समितीला दिले
जिल्हा दौऱ्यावर असलेले पंचायत राज समीतीचे पथक डांभुर्णी गावात येणार असल्याचे ग्राम पंचायतीला माहीत असुनही सरपंच मात्र तेथे निदर्शनास न आल्याने ग्रामपंचायत सदस्य पुरोजीत चौधरी यांनी समितीचे स्वागत केले. सरपंचांना या पथकाचे कुठलेही गांभिर्य नसल्याचे चित्र येथे दिसुन आले.

हे पथक येणार असल्याचे कळताच ग्राम पंचायतीने सकाळी सात वाजताच गावातील साफसफाइला सुरुवात केली जि.प.शाळेजवळील घाणीचे साम्राज्य व खड्ड्यात रेती माती टाकून बुजवण्यात आले आमदारांनी याच रस्त्याने मराठी शाळेकडे मार्गक्रमण केले असता आमदारांचीच गाडी या शाळेच्या परीसरात फसल्याने सर्वांचीच धांदल ऊडाली आमदाराची गाडी काढण्यासाठी ग्रा.प.सदस्यांसह अनेकांनी गाडीला ” दे धक्का “चा ठेका धरला दुसर्या अधिकाऱ्यांच्या वाहन चालकाने गाडी फसणार नाही यासाठी वेग घेतला असता गटारीच्या संरक्षण भिंतीवर गाडी आदळल्याने किरकोळ नुकसानही झाले निदर्शनास आले यामुळे ग्रामपंचायतीची चमकोगीरी अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
ग्रामपंचायत सदस्य शुभम विसवे यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांचेशी वार्ड क्र दोनमधील विविध समस्यांचे निवारण करण्याबाबत व पथदिव्यांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली या पथकासोबत माजी जि. प. सदस्य आर जी नाना पाटील, प. स. सभापती पल्लवी चौधरी, ग्राम पंच्यात सदस्य शुभम विसवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.








