• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाळधीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 1, 2022
in खान्देश, जळगाव
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चाहूल लागली असतांना लसीकरण हेच एकमेव आयुधआहे. आगामी काळात लसीकरण हेच मिशन असावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते .

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले , या आरोग्य केंद्राने जनतेच्या सेवेत रूजू होण्याआधीच कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा एक मापदंड प्रस्थापित केला असून आता परिसरातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असल्याबद्दल आनंद आहे जिल्हा प्रशासन कोरोनाच्या प्रतिकारासाठी सज्ज असून जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पाळधीपासून जवळच पथराड रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याहस्ते याचे भूमिपुजन करण्यात आले होते. यानंतर कोविडच्या दुसर्‍या लाटेत या आरोग्य केंद्राने उत्तम कामगिरी बजावली. या आरोग्य केंद्रात ऑक्सीजन बेडची व्यवस्था देखील करण्यात आली होती. येथून शेकडो रूग्ण बरे होऊन गेलेत. येथे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. या आरोग्य केंद्राचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.आता हे आरोग्य केंद्र पाळधीसह परिसरातील जनतेच्या सेवेत रूजू झाले आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून या प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर प्रशस्त, हवेशीर आणि आरोग्यवर्धक असल्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, या परिसरात जास्तीत जास्त झाडे लाऊन त्याचे संगोपन करण्याची आवश्यकता आहे. या हॉस्पीटलला लागूनच अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील कर्मचार्‍यांनी प्रत्येक व्यक्तीचे समाधान होईल आणि तो रोगमुक्त होईल यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. दोन्ही डोेस फक्त ८० टक्के लोकांनीच घेतले असून उरलेल्यांनी यासाठी तातडीने नोंदणी करावी. आजपासून १५ वर्षांवरील मुला-मुलींची नोंदणी सुरू झाली असल्याने पालकांनी मुलांसाठी तातडीने रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, उदय झंवर, गोकुळ लंके, माजी सरपंच शरद शिंदे, अण्णा पाटील, भागवान मराठे, शरद कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील डॉ. विनय चौधरी व डॉ. प्रशांत गर्ग अरुण पाटील, धनराज कासट, शेरीचे सरपंच कैलास पाटील, मच्छीन्द्र सपकाळे, दत्तू ठाकूर, दिपक सावळे, सौरभ पाचपोळ, यांच्यासह सर्व आरोग्य सेवक सेविका आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तर सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले.

, जोवर पदनिर्मिती होत नाही तोपर्यंत गणेश साळुंख-औषध निर्माण अधिकारी, सरला गुजर-आरोग्य सेविका, प्रदीप पवार-आरोग्य सहायक, स्नेहलता चुंबळे,-आरोग्य सहायिका, रवींद्र माळी-परिचर या कर्मचार्‍यांची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी नियुक्ती आदेश दिलेले असून ते सेवेत रूजू झाले आहेत.


 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

रोकडे येथे साडेसहा लाखाचे दागिने चोरले

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते निंभोऱ्यात व्यायामशाळा व उपकरणांचे लोकार्पण !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते निंभोऱ्यात व्यायामशाळा व उपकरणांचे लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon