धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाळधी येथील सलून व्यावसायिक विजय रमेश तायडे (वय ३२) या तरुणाने मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पंख्याला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. विजय येथील बसस्थानक परिसरात भावासोबत सलून व्यवसाय करत होता. त्याचे एलएलबीपर्यंत शिक्षण देखील पूर्ण झाले होते. विजय हा पत्नी, मुलासह वेगळा राहत होता. कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले. त्याआधीच रुग्णवाहिका आल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. सध्या पत्नी लहान मुलासह माहेरी गेल्याने विजय एकटाच घरी होता. त्याने आईला फोन करून फाशी घेत असल्याचं सांगितलं. त्यांनी तत्काळ खाली राहणाऱ्या लहान भावास कल्पना दिली.
आई-वडील, मोठा भाऊ तो वास्तव्यास असलेल्या श्याम कॉलनी येथील वरच्या खोलीत गेले असता आतून कडी लावली असल्याने दरवाजा तोडावा लागला. सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर विजय गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.