जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुकयातील पाळधी येथील नोबेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नोबेल इंग्लीश मीडियम स्कूलचे चेअरमन प्रशांत सूर्यवंशी व अर्चना सूर्यवंशी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पाटील व डॉ. शीतल पाटील आणि भारतीय सैन्य दलातील अधिकारी पदावर कार्यरत असलेले सलमान सर, दिव्यांग शक्तीचे प्रतिनिधी प्रविण पाटील, निकीता पाटील, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह्या वेळी सैन्य दलातील अधिकारी सलामन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी सगळ्यांचे लक्ष वेधले . डॉ. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात विद्यार्थी कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सलमान खान यांनी भारतीय सैन्यातील शिस्त आणि सैन्य दलातील विविध क्षेत्रात आपण आपले करियर कसे घडवू शकतो या विषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन योगेश करंदीकर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक प्रसाद महाजन ,ऋतिका बाहेती ,सविता पाटील यांचे सहकार्यलाभले. योगेश करंदीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.