पाळधी (प्रतिनिधी ) ;- येथील जीपीएस मित्र परिवार तर्फे सामाजिक बांधिलकी व पर्यावरण चे हित जपत आज सकाळी पाळधी येथील दोन्ही बायपास येथे गोकुलनाथ या जातीचे वृक्ष लावण्यात आले .
हे वृक्ष साधारण 12 फूट उंचीची असून त्याची देखभाल सुद्धा मित्र परिवार तर्फे करण्यात येणार आहे,,या वृक्ष रोपण साठी साई मंदिर संस्थानचे सुनील भाऊ झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले . या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह जीपीएस मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते,,सदर उपक्रमाचे सर्वदुर कौतुक होत आहे .