रावेर तालुक्यातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १६ ग्रॅम वजनाचा व ६४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार लांबवल्याचा प्रकार गावात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप अर्जुन जाधव (वय ३५, रा. पाल ता. रावेर) हे शेती व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे घर शनिवारी रात्री बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील तिजोरीचे लॉक तोडून १६ ग्राम वजनाचा सोन्याचा हार लांबवला. जाधव हे घरी आल्यानंतरच घरफोडीच प्रकार लक्षात आला. रावेर पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेत पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.