भारताचे गृहमंत्री आणि लष्करप्रमुखांना अटक करा – पाकिस्तानची मागणी
लंडन (वृत्तसंस्था ) – पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कारवाया सुरुच आहेत. ज्या ज्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला बोलण्याची संधी मिळते, तिथे भारताविरुद्ध सातत्याने खोटा प्रचार केला आहे. सध्या पाकिस्तानचा भारतीय लष्कराबाबत पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटन पोलिसांना जम्मू-काश्मीरमधील गुन्ह्यांसाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीने कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरीकांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील कथित भूमिकेबद्दल भारतीय लष्करप्रमुख, गृहमंत्री यांच्यासह आणखी आठ उच्च लष्करी अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या युद्ध गुन्हे युनिटला तथाकथित पुरावे सादर केले आहेत.