यावल ( प्रतिनिधी ) – यावल शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेला पतीकडून अनैसर्गिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच विवाहितेच्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही म्हणून माहेरहून पैश्यांची मागणी करत विवाहितेचा छळ केला. विवाहितेला हा अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस कर्मचारी करीत आहे.