जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील म्हसावद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पद्मालय शॉपिंग सेंटरमधील अनेक दुकाने पाण्याखाली गेली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे साहित्य आणि माल खराब झाला आहे. दुकानात थेट पाणी शिरल्याने अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, मोबाईल दुकाने, चप्पल-बूट दुकाने, फर्निचर दुकाने, कपड्यांची दुकाने, टेलरिंग दुकाने, सौंदर्यप्रसाधनांची दुकाने आणि सीएससी केंद्रांना बसला आहे. अनेक दुकानदारांचा जीवनावश्यक वस्तूंपासून ते मौल्यवान सामानापर्यंतचा सर्व माल पाण्यात भिजून खराब झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या दुकानदारांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या नाल्यांची आणि पाणी वाहून नेणाऱ्या इतर व्यवस्थेची दुरुस्ती करावी. याशिवाय, ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य ती भरपाई तात्काळ द्यावी.” या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकसानग्रस्त दुकानदारांची यादी*
वीरेंद्र भारत मिस्तरी: ममता फर्निचर
* श्रीराम सुरेश भोई: श्रीराम मोबाईल शॉप
* अशोक पुंडलिक पाटील: इंदिरा टीव्ही सेंटर
* भूषण सदाशिव पाटील: श्री गजानन फुट वेअर
* इरफान शेख: लकी बूट हाऊस
* दस्तगीर शेख: लकी फुटवेअर
* निलेश मोरे: राजमुद्रा मोबाईल
* कल्पेश मुजुमदार: फोटो स्टुडिओ
* करण बाळू मिस्तरी: सीएससी सेंटर
* कुणाल ईश्वर पाटील: कुणाल टेलर्स
* परशुराम पाटील: फोटो स्टुडिओ