सर्व पक्ष व सर्व धर्मीय गणेश भक्तांनी धरला गाण्यावर ठेका ; शांततेत विसर्जन संपन्न
जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील पहुर येथे गणपती बाप्पाला अखेरचा निरोप गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात देवून, शांततेत गणेश विसर्जन करण्यात आले.
पहुर शहरातील मानाचा गणपती असलेल्या छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मंडळ, जय मल्हार अहिल्यादेवी होळकर गणेश मंडळ, आदर्श त्रिमूर्ती गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, न्यू गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, जय योगेश्वर गणेश मंडळ, यांच्यासह शहरातील 1000 घरगुती गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडेना गावाला आदी घोषणेने शहर दुमदुमले. ढोल – ताशा, बँड पथकासह गणेश भक्तांनी धरला गाण्यावर ठेका सायंकाळी चार वाजता सर्व गणेश मंडळांनी सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरा वाघूर नदीवर गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
अहिल्यादेवी होळकर नगर, हनुमान मंदिर, देशमुख गल्ली, पाटील गल्ली, जुम्मा मज्जित चौक, बारी वाडा, बाजार पट्टा, राम मंदिर, मेन रोड या मार्गाने सर्व गणेश उत्सव मंडळांनी मिरवणूक काढून वाघुर नदी तीरावर अखेरचा गणपती बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला.
येथील मुस्लिम बांधवांनी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव मंडळांचा व पदाधिकारी हार – गुच्छ देऊन स्वागत केले. या मिरवणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजदर पांढरे, छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते गणेश भाऊ पांढरे, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम भाऊ सावळे, माजी कृषी सभापती संजय देशमुख, माजी उपसरपंच ईकापैलवान, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्या आघाडी तालुकाध्यक्ष राजू भाई जेंटलमेन, भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख सलीम शेख गनी, मिनाज भाई शेख, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, भाजपा शहर अध्यक्ष संदीप बढे, भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते किरण पाटील, मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, युवा नेते महेश पाटील, शिवसेना शहर संघटक संजय देशमुख, अफजल तडवी, फिरोज तडवी, तोफिक तडवी, विकास सोसायटीचे संचालक राजेश लोढा, कसबे सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
महिला गणेश भक्तांनी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मंडळ, राम मंदिर येथील गणपती बाप्पाची आरती पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्या हस्ते करण्यात आली. जुम्मा मज्जित चौकात पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, ठाणे अमलदार रवींद्र देशमुख, भरत लिंगायत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विसर्जन शांततेत पार पडले.