जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रणाकरीता, प्रशासकिय निकडीनुसार व प्राप्त गंभीर तक्रारीच्या अनुषंगाने ६ पोलीस निरीक्षक यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या केल्या आहेत . पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पो नि अरुण धनवडे यांची कसुरीवरून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे .
या आदेशानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप इंगळे यांची पहुरला बदली करण्यात आली आहे . जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पो नि गजानन पडघन यांची भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे . भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो नि दिलीप भगवंत यांची जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे . बोदवडचे पो नि राहुल गायकवाड यांची भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे जळगावच्या नियंत्रण कक्षातील पो नि राजेंद्र गुंजाळ यांची बोदवड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे . पो नि धनवडे वगळता अन्य सर्व बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.