जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी सांगवी शिवारातील शेतात मका व कपाशी पीक पाहणी कार्यक्रम U s Agri seeed या कंपनीच्या U s 7067 या वाणाची पीक पाहणी कार्यक्रम प्रगतशील शेतकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कंपनीचे प्रतिनिधी अमोल पुंडलिक, गोपाल काकडे, किरण भोई आदींनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच श्याम भाऊ सावळे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश राव पांढरे विकास सोसायटीचे चेअरमन किरण खैरनार ग्रामपंचायत सदस्य भारत पाटील संदीप बेढे शरद पांढरे शेतकरी रवी बारी महेश सावळे समाधान पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







