पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.न. ता. जि. जळगांव येथील दिवंगत प्राजक्ता अजय बारी (बुंदे) हिच्यावर झालेल्या अत्याचार व खुनाबाबत गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सुर्यवंशी बारी समाज पंचमंडळतर्फे पहूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि , पहूर येथील सुर्यवंशी बारी समाज पंचमंडळ व सर्व समाज बांधव आपणास नम्रपणे अशी मागणी करतो की कि. १९.जानेवारी रोजी शिरसोली प्र.न. ता. जि. जळगांव येथे प्राजक्ता अजय बारी हिचा खून झालेला असुन परंतु सासरच्या लोकांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला आहे . प्राजक्ता बारी हिच्यावर सासरच्या लोकांनी अतोनात आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे माहेरच्या मंडळी कडून कळते. समाजामध्ये हुंडाबळी संख्येत वाढ होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सदर प्रकरणाचा नि:पक्ष तपास हा वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्या कडुन होण्यास व सदरचा खटला हा जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा व त्यासाठी अॅड.उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणुक करण्यात यावी व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. सुर्यवंशी बारी समाज प्रगती मंडळ अध्यक्ष ईश्वर दौलत फुसे , उमेश बाबुराव नागपुरे, उपाध्यक्ष एकनाथ रामदास नागपुरे आदींनी हे निवेदन दिले.