कायद्याच्या चौकटीत आंदोलनातून धडा शिकवण्याची तयारी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शेंदुर्णी गावात दोन गटांमधील वाद मिटावा म्हणून पहूर पोलीस ठाण्यात गेलेले युवासेना शहरप्रमुख अजय भोई यांच्या विनाकारण कानशिलात लागवणारे पो. नि. अरूण धनवडे यांची बदली ३ दिवसात करून कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून दिलेल्या निवेदनात दिला.
पहूर पोलीस ठाण्याचे पो नि अरूण धनवडे सामान्य नागरीकांना दबंगगिरीची वागणूक देतात . पोलिसांची भूमिका हुकूमशाहीची नसते , पोलिसांनी जनतेत आणि प्रशासनात समानव्याची भूमिका ठेवणे अपेक्षित असते . या वादाशी अजय भोई यांचा थेट संबंध नव्हताच पण पो नि धनवडे यांनी दबंगगिरीचा झटका दाखवण्याची खुमखुमी काल जिरवून घेतली असा संताप या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अजय भोई यांनी धनवडे यांना जाब विचारला की काही कारण नसताना माझ्या कानशिलात का मारली तर धनवडे हे दाबंगिरीची भाषा वापरतात असे अजय भोई यांनी सांगितले अजय भोई यांनी शिवसनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांना सांगितले. शिवसेना पदाधिकारी यांनी सांगितले की धनवडे हे सामान्य माणसाशी दबांगिरी करतात. जामनेर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दाद मागण्यासाठी जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ३ दिवसात निर्णय न घेतल्यास पहुरच्या बसस्थानकासमोर २० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. युवा सेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील, डॉ मनोहर पाटील , अँड भरत पवार , राकेश गुजर, विशाल वाणी, विकास पाटील, विजय लाड , अतुल घुगे , उपतालुका संघटक सुधाकर सराफ , विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील , उपतालुकाप्रमुख सुनील अग्रवाल , शेंदूर्णीचे शहर प्रमुख संजय सूर्यवंशी , जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ , जामनेर उपशहर प्रमुख कैलास माळी , मनोज देवकर , तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.