पहूर ,ता . जामनेर (प्रतिनिधी ) : – जामनेर तालुक्यातील पहूर येथील 7 भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा शहर शिवसेना शाखेच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला .शिवसेना शहर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील हे होते . त्यांनी या तरुणांबद्दल बोलताना सांगितले की ,पहूर नव्हे तर जिल्ह्याचा हा अभिमान आहे . सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सर्व सातही तरुणांनी अभिमान वाटावा असे कार्य केले आहे .त्यांच्याकडून देशाची चांगल्या प्रकारे सेवा घडो ,आपल्या गावाचे नाव उज्वल होवो अशा शुभेच्छा देत म्हणाले की , देशाचा सैनिक आपल्यासाठी देवच असतो . अशा तरुणांना देवच मानले पाहिजे . आज रक्षण करण्यासाठी खरे देव हेच असतात ,असे गौरवोद्गार त्यांनी कढून या तरुणांना भारतमातेच्या रक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रतोद गणेशराव पांढरे यांनी केले .यावेळी पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे यांना पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कोरोना योद्धा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचा शिवसेना शहर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला . तसेच जळगाव जिल्हा साहित्य मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनी आयोजित कविसंमेलनात प्रभावी कविता सादरीकरण केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रमेश बनकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला .
यावेळी शहर पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे ,रमेश बनकर, मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष पाटील चिंचोले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा नव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव , सुकलाल बारी, ग्रामपंचायत सदस्य इका पहिलवान ,इस्माईल शेख ,पत्रकार संघटनेचे सचिव जयंत जोशी, कुमावत युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कुमावत, शांताराम गोंधनेखेडे , विजय देशमुख , शुभम घोलप ,शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोंधनखेडे ,दिलीप पांढरे ,आतिक पिंजारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेशराव पांढरे यांनी केले तर आभार शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे यांनी मानले .

यांचा झाला गौरव
इम्रान अब्दुल रहिम पिंजारी (आसाम रायफल ) ,शकुर कुदबुद्दिन तडवी ( सी आय एस एफ ), शाहरूक युनूस तडवी ( आसाम रायफल ), गजानन प्रभाकर पांढरे ( आसाम रायफल ), शरद सुकलाल भोई (बी एस एफ ),प्रमोद अशोक सोनार ( सी आय एस एफ ), अतुल सुरेश पाटील ( एस एस बी )







