अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागात घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील बंगाली फाईल परिसरात घरमालक कामाला निघताच ४ दरोडेखोरांनी हातात चाकू घेऊन घरातून सुमारे ४० हजार रुपये आणि ५ तोळे सोने लुटून नेल्याची घटना २५ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दीपक पुंडलिक पाटील हे अयोध्यानगर, बंगालीफाईल या ठिकाणी रेल्वे दलात तांत्रिक म्हणून नोकरीला आहेत. पहाटे ५ वाजता ते नोकरीला जायला निघाले आणि काही वेळात त्यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यानी हातात चाकु घेऊन प्रवेश केला. घरातील व्यक्तीला चाकू लावून घरातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील सुमारे ५ ते ६ तोळे सोने तसेच अंदाजे ४० हजार रुपये रोख लुटून नेले.डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे , प्रशांत पाटील, गणेश पाटील, विनोद सोनवणे, सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.