डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
जळगाव ( प्रतिनिधी ) – माझे बाबांनी वैद्यकिय पदवी घेतल्यानंतर त्यांचे काम पुढे सूरू करण्याबाबत विचारले आणि हो म्हणून शब्द दिला तोच खरा आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.


डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सन २०२० च्या बॅचचा दिक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मंदाकीनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सदस्य, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच यावेळी डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी पदवी प्रदान सोहळ्याची घोषणा करत महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती विशद केली. तसेच या समारंभाला पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ मंदाकीनी आमटे यांची उपस्थिती लाभल्याने २०२० ची बॅच ही अत्यंत भाग्यशाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य सेवेची गरज- डॉ. मंदाकीनी आमटे
प्रेम, त्याग आणि करूणेने रूग्णांची सेवा करणे गरजेचे आहे. पदवी हा आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो त्यात पुढे अनेक पदव्या जरी मिळाल्या तरी पहिल्या पदवीला महत्व असते ती मिरवण्यासाठी नसते हे लक्षात घेतांना आज तुम्हाला जरी डिग्री मिळाली असली तरी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मोठ्या शहराकडे न वळता ग्रामीण भागात एक किंवा दोन वर्ष आरोग्य सेवा बजवावी असे आवाहन डॉ.मंदाकीनी आमटे यांनी केले.
प्रामाणिक वैद्यकिय तत्वांची अंमलबजावणी करा – डॉ. प्रकाश आमटे
दिक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागात आजही खूप गरीबीची परीस्थिती आहे. त्याठिकाणी आरोग्याच्या सुविधाही तोकड्या स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गरीबी न विसरता ग्रामीण भागातील सेवा द्यावी. त्याचप्रमाणे पदवी घेतलेल्या डॉक्टरांनीही वैद्यकिय तत्वांचे पालन करीत हृदयात देश आणि नजरेत रूग्ण ठेवावा असा सल्लाही पद्मश्री डॉ. बावस्कर यांनी दिला. यावेळी डॉ. आमटे यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास कथन केला. डॉ.प्रकाश आमटे हे गडचिरोलीत हेमलकसा या ठीकाणी त्यांचे वडील पदमश्री बाबा आमटे यांचा वसा हाती घेवून कार्य करीत आहे अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावलेले संशोधक आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. आरोग्य,शिक्षण आणि आदीवासी सेवा हीच आपली संपत्ती असल्याचे त्यांनी सांंगितले.
१५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या दिक्षांत समारंभात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या १५२ विद्यार्थ्यांना पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. आपला पाल्य डॉक्टर झाल्याने अनेक पालकांच्या डोळे आनंदाश्रुंनी डबडबलेले दिसून आले. वरूण नन्नवरे,सारा पटेल,अनीरूध्द टेणपे, श्रुती सिंग,अमीत साखरे, बुशरा खान,चिंतन चौधरी विद्यार्थी आणि गिता कांबळे,नितीन राय या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रगिताने समारोप केला. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी अधिरथ बॅचच्या विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार श्रध्दा पाटील,श्रेयन व्यवहारे,नंदिनी ढोरे,स्वराज उभाद हयांनी मानले.









