• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव शहरात मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना सिमेंट भरताना बांधकाम धसल्याने, तोल जाऊन पडल्यामुळे ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (रा. तानाजी मालुसरे नगर,असोदा रोड जळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे.

मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार सुरेश मिस्तरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सोनार हे विशाल चव्हाण आणि सुनील सपकाळे या इतर दोन मजूरांसोबत पाचव्या मजल्यावरील लिंटर माळाचे काम करत होते.

त्या ठिकाणी सिमेंट भरत असताना अचानक बांधकाम धसले आणि मुकेश यांचा तोल गेल्याने ते थेट पाचव्या मजल्यावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर घटनास्थळी प्राथमिक पाहणी केली असता, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा जाळी किंवा इतर कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नसल्याचे दिसून आले आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.

मयत मुकेश सोनार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगी,आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिकारी व कर्मचारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत.


 

 

Tags: pachvya majlyavarun padun mrutu
Previous Post

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon