पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभाग ९ साठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे भूमिपूजन आज करण्यात आले.
पाचोऱ्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील तलाठी कॉलोनी लगतच्या मयूर पार्क, संतोष पाटील नगर, गोविंद नगरी, जय गणेश नगर या भागाचा बर्याच दिवसापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगरपरिषदेतील गटनेते संजय वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे आता मार्गी लागला आहे.
या जलवाहिनीच्या खोदकामाचा श्रीगणेशा व भूमिपूजन नगरपालिका गटनेते नगरसेवक संजय वाघ व नगरसेविका रंजना भोसले यांचे हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी सुभाष गोसावी , आर. एस आन्ना , पाणी पुरवठा सभापती विकास पाटील , नगरसेवक वासुदेव महाजन, श्री मोरे .. पाणी पुरवठा अभियंता , सौ. सरला पाटील, दत्ताभाऊ बोरसे, मनीष बाविस्कर , सतीश देशमुख, हरूनदादा देशमुख, आर. एस. पाटील, व्यंकट बोरसे , विवेक बाविस्कर , दीपक ब्राह्मणे , जगदीश देसले , सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील , डॉ आर डी पाटील, श्री दावभट , अशोक हटकर , सुनील निकम , चव्हाण अप्पा, अजय मिस्तरी, प्रकाश पाटील, पुरुषोत्तम वाणी, श्री कापुरे , श्री देसले , संजय खैरणार यांच्यासह गोविंद नगरी, तलाठी कॉलनी, संतोष पाटील नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.