पाचोरा शहरात बहिरम पुलावर घटना, संशयिताला अटक
पाचोरा (प्रतिनिधी) :- चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या संशयातून एका २० वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न एका संशयित आरोपीने शहरातील बहिरम पुलावर केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला संशयितास अटक करण्यात आली आहे.
चाकू हल्ल्यात जखमी अनिल रवींद्र भिल (वय-२० रा.बहिरम नगर,पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी हा त्यांचे मित्रांसह बहिरम नगर पुलावर उभा होता. यावेळी संशयित इरफान चिरागदिन तडवी (रा.बहिरम नगर,पाचोरा) हा त्याने चोरी केलेल्या मोटार सायकलची माहिती पोलीसात दिल्याचा राग मानत ठेवून तेथे आला. फिर्यादीच्या मागून येत फिर्यादीच्या पाठीत त्याचे हातातील चॉपरने वार करून फिर्यादीच्या गळ्यावर चॉपर लावून जीवे मारण्याची धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीवरून संशयित आरोपी इरफान चिरागदिन तडवीविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी इरफान तडवी यास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ, डीबीचे रणजित पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, श्रीराम शिंपी, गणेश कुंवर यांनी ताब्यात घेत अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत.