पाचोरा ( प्रतिनिधी ) – आता भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला येथील सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे
पाचोरा ग्रामीणसह आता शहरातदेखील शिवसेनेला गळती लागली असून भाजपाने शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असताना काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे .
शिवसेनेमधील वाढती घुसमट व आमदार किशोर पाटील जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे आज या कार्यकर्त्यांनी सांगितले.
ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळांत शिवसेना व राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडेल प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य सन्मान राखून लवकरच शहरांतील महत्वाच्या जबाबदाऱ्यादेखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव तालुके मिळुन प्रवेश सोहळाआमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ.भुषण मगर, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, विकास वाघ (गोटू शेठ), सरचिटणीस दिपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, राहुल गायकवाड, टिपू देशमुख, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, समाधान पाटील, हरीश पाटील उपस्थित होते.