पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरात डासांपासून होणारे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून नगरपरिषदेने कीटकनाशकांची फवारणी करावी अशी मागणी होत आहे .

पाचोरा नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आठवड्यातुन एकदा तरी डांसनाशक औषधीची फवारणी करण्यात यावी त्यामुळे शहरात डेंगु, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, चिकण गुणिया यासारख्या आजारांवर मात करून शहरातील रोगराई कमी करण्यासाठी पालिकेने योग्य उपाय योजना करावी , अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केली आहे .







