पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा कॉंग्रेसच्या पदाधिकारींना रक्षाबंधन निमित्ताने महीला पदाधिकारींनी राखी बांधून अनोखा उपक्रम राबविला आहे.

पाचोरा काॅग्रेस कडुन रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात महीला आघाडीच्या पदाधिकारींनी कॉंग्रेसच्या पदाधिकारींना राखी बांधून औक्षण केले. या अभिनव उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यावा, असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महीला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा श्रीमती कुसुम पाटील, शहराध्यक्षा श्रीमती शिला सुर्यवंशी, कल्पना निंबाळकर, साक्षी सुर्यवंशी, रेखा पाटील, कमळाबाई पाटील, आदींच्या हातुन राखी बांधण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी प. स. सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अॅड. वसीम बागवान, मुकेश पाटील, बबलु पाटील, संजय सोनार, पप्पू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा शहरात होती.







