नाकाबंदीदरम्यान ४ हजाराचा मुद्देमाल जप्त
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरात नाकाबंदीदरम्यान पोलिसांना एका युवकाकडे पिशवीत हिरव्या रंगाचे अमली पदार्थ असलेले भांगेच्या वड्या आढळून आल्याने त्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करून संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला दि. ५ एप्रिल रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे.
वरखेडी नाका, जळगांव चौफुली, पाचोरा येथे सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना पवन पाटील, पोकों गजानन जोशी, पोकों संतोष राजपुत असे नाकाबंदी करीत होते. त्यांना गुरुवारी दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक इसम हा हातात पिशवी घेवुन जात असतांना पोलीसांना पाहुन तो त्याचे हातातील पिशवी लपवुन संशयास्पदरित्या लपत छपत जात होता. सदर इसमांस पोलीसांनी थांबवुन, त्याचे पिशवीत काय आहे हे बघीतले. पिशवीमध्ये प्लास्टीकच्या बंद पुड्यांमध्ये हिरव्या रंगाचे शेंडे व फुले होते. तसेच प्लास्टीकच्या पिशवीत गाठ मारलेली होती. त्यात हिरव्या रंगाचे अमली पदार्थ अर्थात भांग आढळून आली.
त्यानुसार संशयित साई ज्ञानेश्वर चित्ते (वय १९, रा. जळगाव चौफुली, पाचोरा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कब्जातील पिशवीत ४ हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्याचेविरुध्द पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/ धरमसिंग सुंदरडे हे करीत उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोहेकॉ राहुल शिंपी, पोहेकॉ ज्ञानेश्वर महाजन, पोकॉ योगेश पाटील, मसफौ शारदा भावसार यांनी पार पाडली आहे.