पाचोरा शहरातील आनंद नगर येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील आनंद नगर परिसरातील एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश अशोक पवार (वय २३ वर्ष, रा. आनंद नगर, पुनगाव रोड, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश याचे पश्चात आई, वडिल, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.अविनाश हा शहरातील पेट्रोल पंपावर काम करुन कुटुंबियांना हातभार लावत होते. त्याचे आई व वडील मजुरी करतात. अविनाश याने राहत्या घरात दि. २३ आॅगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. तरुणास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तरुणास मृत घोषित केले. अविनाश याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय. रणजीत पाटील हे करीत आहे.