पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक साधारण बैठकीसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य प्रशासक मा. आ. दिलीप वाघ,आमदार किशोर अप्पा पाटील, पी.टी. सी.संजय नाना, प्रशासक रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, अनिल महाजन, सचिव बोरुडे व बाजार समितीचे सर्व माजी सभापती दगाजी अण्णा, राजू आबा, जयवंत आप्पा, मोहन अण्णा , नानासाहेब देशमुख ,शाम भोसले नितीन तावडे,पंढरी पाटील, अनिल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भडगाव व पाचोरा तालुक्यातील ४० आदर्श शेतकरी,आदर्श दुग्ध व्यावसायिक,आदर्श व्यापारी,आडते,आदर्श हमाल मापाडी, यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सुमारे २००० भूमिपुत्र, शेतकरी प्रतिनिधी ग्राम पंचायत सदस्य,व्यापारी उपस्थित होते.
या प्रसंगी दिलीप वाघ यांनी बाजार समितीच्या केलेल्या विकास कामांचा आढावा व शेतकरी हिताचे घेतलेल्या उल्लेखनीय निर्णयाचे कामांचा घेतला. मा. आमदार किशोर पाटील यांनी व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयामुळे बाजार समितीचे हित व उत्पन्न देखील प्रशासक मंडळाने वाढवले याचे कौतुक केले. सहकारात संस्थेच्या हितासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे देखील दोन्ही नेत्यांनी केले.