पाचोरा ;- शहरातील भडगाव रोडवरील सक्तीधाम येथे आज कै . डॉ. शरद विसपुते यांच्या पुण्यतिथी आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दिवस आपल्या छंदासाठी या महिलांसाठी तालुकास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज सकाळी १० ते १२ यावेळेत करण्यात आले होते .

यावेळी स्व. डॉ. शरद विसपूते यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात येऊन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला . यावेळी महिलांनी काढलेल्या विविध सुबक रांगोळ्या पाहून उपस्थितांनी सर्वांचेच कौतुक केले . या स्पर्धेत ५० महिला सहभागी झाल्या होत्या . यात प्रथम क्रमांक द्वितीय ,तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे विजेत्या महिलांना रोख स्वरूपात अनुक्रमे ११००,७००,५०० अशी देण्यात आली . याप्रसंगी रमेश मोर , डॉ. चंदकांत विसपुते, डॉ. संकेत विसपुते, भैय्यालालजी महेंद्र अग्रवाल, मोरे सर , मीना मोर,ज्योती अग्रवाल ,सीमा अग्रवाल, सुनीता मोर, कल्पना मोर, यश मोर आदी उपस्थित होते . स्पर्धेचे परीक्षक म्हणुन श्री. कुलकर्णि सर शीतल महाजन संगीता अग्रवाल, टिना अग्रवाल यांनी काम पहिले.







