पाचोरा ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या या तालुक्यातील पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.


डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या रूग्णसेवेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी रेल्वे स्टेशन रोडवरील बी. ए. मराठे कॉम्प्लेक्स येथे पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, वेबपोर्टलसह सर्व माध्यम समूहात कार्यरत पत्रकार यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिराला उपस्थिती देतांना चेहर्यावर मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, पत्रकारांनी जुना चष्मा सोबत आणावा. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन तेजोदीप नेत्रायलाचे संचालक डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटरी क्लब सचिव डॉ. पंकज शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर शिवाजी शिंदेसह रोटरी क्लब पाचोरा – भडगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.







