पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय दिव्यांग विवाहिता अर्चना रमेश चव्हाण (31) यांनी
आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

कृष्णापुरी भागात रमेश चव्हाण हे कुटुंबासह राहतात. अर्चना चव्हाण यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. विवाहितेने गळफास घेतल्याचे कळताच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात अर्चना चव्हाण यांना हलवले वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. मयत विवाहिता या अंबिका किराणा स्टोअर्स संचालक रमेश ज्ञानदेव चव्हाण यांच्या पत्नी होत.







