उत्तर कार्याच्या खर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पाटील (जगताप) कुटुंबीयांनी त्यांच्या वृद्ध आईच्या निधनानंतर खर्च, दिखावा, कर्मकांड टाळून समाजप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या वृक्षांचे संगोपन व संवर्धन त्यांनी आईप्रती असलेल्या निष्ठा आणि ममत्वाच्या प्रतीक म्हणून करण्याचा संकल्प केला आहे. त्या वृक्षांमध्ये आईचे रूप पाहण्याची आणि तिच्या आठवणींचे जतन करण्याची त्यांची भावनिक भावना खरोखरच हृदयस्पर्शी आहे.
शांताबाई पाटील यांच्या तिन्ही मुलांवर ग्रामीण संस्कार असले तरी विचार मात्र पुरोगामी आहेत. मोठे चिरंजीव अर्जुन पाटील हे मुंबईत नोकरी करतात, तर पोपट पाटील गावातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. तिसरे चिरंजीव राजेंद्र पाटील हे पाचोरा एसटी बस आगारात मुख्य मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. ते पाचोरा मॉर्निंग वॉक व योगा ग्रुपचे अध्यक्ष असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत.