श्रावण महिमा, श्रद्धेची प्रार्थना अन् नगरसेवकासाठी जनतेची इच्छा
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील एकदंत रेसिडेन्सी आणि परिसरातील नागरिकांनी श्रावण मासाचे औचित्य साधत, ओपन पेसमध्ये भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन केले.
ही पूजन विधी किशोर रायसाकडा (पत्रकार) व राकेश सुतार यांनी केली. नागरिकांनी भगवान शंकरापुढे विशेष संकल्प करत, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनसेवक बंडू केशव सोनार हे मोठ्या मतांनी नगरसेवकपदी निवडून यावेत, अशी प्रार्थना केली.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान शंकराच्या प्रतिमेला कडी खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी येणाऱ्या गणेश उत्सव व दुर्गा उत्सवाच्या नियोजनावर चर्चा केली. यावेळी एकदंत रेसिडेन्सी, गणेश उत्सव, दुर्गादेवी उत्सव समिती अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव भागवत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी या भागातील स्थानिक समस्या पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, प्रकाशयोजना अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय झाला. नागरिकांच्या मागणीनुसार, लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांनी दिले.
बंडूभाऊंनी यावेळी सांगितले की, “आपल्या समस्या आमदार किशोर पाटील यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवून, त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजित पाटील,बंटी पाटील ,ॲड.पि डी पाटील, रोहित, किशोर पाटील, सचिन वखरे आदि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.