कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा लागला २ दिवस कस
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- पाचोरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावाजवळ बुधवारी झालेल्या भीषण अपघातात १२ जण मृत्युमुखी पडले होते. यातील १० जणांचा मृतदेह घरी रवाना झाले आहेत. तर दोघं अद्याप नातेवाईकांच्या प्रतीक्षेत आहेत. एका अनोळखी पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही. गेली २ दिवस आरोग्य विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे विभाग, पोलीस दलाचा कार्यवाही करण्यासाठी कस लागला होता.
सदर पाचोरा रेल्वे दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक जणांचे जाबजबाब घेतले जात आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यावर देखरेख सुरु आहे.(केसीएन)तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द कार्यवाही पूर्ण झाली आहे. मात्र मयत इम्तियाज अली या उत्तर प्रदेश येथील रहिवासी व्यक्तीचे नातेवाईक अद्याप संध्याकाळी येणार असल्याने मृतदेह नातेवाईकांच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आला आहे. तर एक ३५ ते ४० वयोगटातील पुरुष अद्याप अनोळखी आहे. अनोळखी पुरुषाची ओळख पटविण्याकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.