पाचोरा (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाचोरा पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक पद रिक्त होते. दोन महिन्यांपासून जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला होता. अखेर गुरुवारी दि. ७ मार्च रोजी नाशिक ग्रामीण पिंपळगाव बसवंत येथे कार्यरत असलेले व मुळचे नाशिक येथील रहिवाशी अशोक कचरु पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे. पोलिस निरीक्षक यांचे स्वागत पत्रकार नंदकुमार शेलकर, प्रमोद पाटील, राजेंद्र सांळुखे यांनी केले.