पाचोरा ( प्रतिनीधी) – सामनेर ता. पाचोरा येथे नुकतीच इंन्डैन कंपनीची गॅस एजन्सी परवानगी मिळाली असून ह्या एजन्सीचे गोडावून भर वस्तीत असल्याने त्या पासून जीवीताला व मालमत्तेला हानी होऊ शकते. त्यामुळे ही एजन्शी गावा बाहेर व सुरक्षित ठिकाणी हलवावी. यासाठी येथील ऊषा मधूकर पाटील, अरुणा शांतीलाल पाटील, सुमित्रा मनोहर पाटील, मालती प्रकाश पाटील, निर्मला दत्तू पाटील, संगीता विजय पाटील, शितल बापू पाटील, सबनूर मस्तान काकर, रंजना प्रभाकर पाटील, मनिषा संभाजी पाटील, अर्चना विजय देसले, वैशाली संदिप चव्हाण, चित्रा राजेंद्र सुर्यवंशी, अर्चना गजानन पाटील ह्या महिलांनी तहसिलदार कैलास चावडे यांचेकडे लेखी निवेदन दिले आहे. महिलांनी दि. २५ जानेवारी रोजी सभेत ठराव मांडला होता. मात्र त्याचा काही एक उपयोग न झाल्याने महिलांनी दि. २५ रोजी थेट तहसिल कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. याबाबत तहसिलदार कैलास चावडे यांनी पूरवठा निरीक्षक उमेश शिर्के यांना निवेदन देवून त्वरीत चौकशी करण्याच्या सूचना देवून आलेला अहवाल जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे महिलांना आस्वासीत केले.