पाचोरा (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना अधिकृत उमेदवार आ. किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आ. किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे.
पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांचेसह आनंद पाथरवट, बबलू पाथरवट, विनोद संदांनशिव, सचिन संदांनशिव, गजानन पाथरवट, वाल्मीक सोनवणे, विशाल संधान, शिव चेतन साळुंखे, सागर संदांनशिव, आकाश पाथरवट, अजय संदांनशिव, योगेश काळे, विष्णु संदांनशिव, शिव गोपाल काळे, कुणाल चंदनशिव, कल्पेश काळे, विनोद पाथरवट, सूर्यकांत पाथरवट, अनिल पाथरवट, संजय पाथरवट, दीपक पाथरवट, पांडुरंग पाथरवट व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
मतदार संघात झालेल्या विकासकामांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं असे एकमताने ठरविण्यात आले. त्यामुळे सर्वांनी आगामी निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प करत त्यांना समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.