पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पाचोरा भडगाव मुस्लिम बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेचे उद्घाटन दि.3 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मा नगरसेवक भुषण वाघ यांच्या हस्ते पार पडले.
या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता क्रिकेट स्पर्धेत पाचोरा भडगाव येथील संघांनी सहभाग नोंदवला
प्रथम बक्षीस गाजी क्रिकेट क्लब पाचोरा यांनी तर दुसरें बक्षीस पाचोरा रायडर यांनी पटकावले स्पर्धेचे रात्री साडेआठ वाजता बक्षीस वितरण युवा नेते मा. नगरसेवक भुषण वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी गौरव वाघ, दुष्यंत रावल, सुनील पाटील सर जाकीर खाटीक, रियाज बागवान, सईद शेख, विनोद पाटील, डॉ. आलम देशमुख, दानिश बागवान, अकबर खान, दिपक पाटील,लतिफ खान, शरद पाटील, राजु शेख या मान्यवरांसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेचा आयोजक व मार्गदर्शन म्हणून फहीम शेख यांनी काम पाहिले.