पाचोरा ते माहेजी दरम्यान घडली घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरसाडे येथील वृद्ध पाचोरा ते माहेजी रेल्वेस्थानक दरम्यान रेल्वे अपघातात ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत पाचोरा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भीमसिंग भावसिंग पाटील (वय ७०, रा. वरसाडे, ता. पाचोरा) असे मयत वृद्ध इसमाचे नाव आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२:२६ वाजेच्या सुमारास पाचोरा ते माहेजी रेल्वे स्थानक दरम्यान भीमसिंग भावसिंग पाटील यांचा कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती संदीप धनसिंग पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेबाबत पाचोरा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.