भाजपाप्रणित पॅनलला २ जागांवर यश
पाचोरा (प्रतिनिधी) ; येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची लढत अतिशय चुरशीची झाली. या लढतीत शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांच्या गटाला सर्वाधिक ९ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ७ जागांवर विजय मिळविता आला आहे. २ जागांवर भाजपप्रणीत २ उमेदवार विजयी झाले आहे.
सर्व साधारण मतदार संघात गणेश पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पवार, मनोज महाजन, विजय पाटील, शामकांत पाटील, सतिष शिंदे, महिला राखीव मतदार संघात पुनम पाटील, सिंधु शिंदे, ओबीसी मतदार संघात उध्दव मराठे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात लखीचंद पाटील, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात सुनिल पाटील, डॉ. निळकंठ पाटील, आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात राहुल पाटील, मागासवर्गीय मतदार संघात प्रकाश तांबे, व्यापारी मतदार संघात मनोज सिसोदिया, राहुल संघरी तर हमाल मापाडी मतदार संघात युसूफ पटेल हे विजयी झाले.